ETV Bharat / state

मुलींचा जन्मदर वाढाविण्यासाठी कारखेडाच्या महिला सरपंचाची अनोखी शक्कल - washim special news

स्री भ्रूण हत्या थांब्यात व मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील नवनिर्वाचित सरपंचांनी अनोखी योजना सुरू केली आहे. तसेच महिलांसाठी विविध योजना राबवत आहेत.

washim
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 4, 2021, 5:29 PM IST

Updated : Mar 4, 2021, 9:01 PM IST

वाशिम - स्त्री भ्रूण हत्या थांबून मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सरकारकडून 'बेटी बचाव बेटी पढाओ' सारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, मुलींचा जन्मदर वाढत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यावरच उपाय म्हणून मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील महिला सरपंचांनी गावात मुलगी जन्मताच तिच्या नावे एक हजार रुपये बँकेत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गावातील महिलांना विमा कवच तसेच विधवा महिलांना मोफत रेशन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुलींचा जन्मदर वाढाविण्यासाठी कारखेडाच्या महिला सरपंचाची अनोखी शक्कल

सरपंच पदाची धुरा सांभाळताच घेतला निर्णय

मानोरा तालुक्यातील कारखेडा हे 2 हजार 700 लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असल्याने मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी यंदा नव्याने सरपंच झालेल्या सोनाली सोळंके यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच मासीक सभेत मुलींचा जन्मदर वाढणे तसेच महिलांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

कर भरणाऱ्यांना मोफत दळण

गावात एकूण 675 कुटुंब असून प्रत्येक घरी घरगुती गॅस देऊन गाव चुलमुक्त करण्यात आले आहे. तसेच कर भरणाऱ्या नागरिकांना वर्षभर गिरणीतून मोफत दळण देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गावात घर तिथे शौचालय ही योजना राबवतच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मुलींचा जन्मदर वाढण्यास नक्कीच होईल मदत

केंद्र तसेच राज्य सरकारकडून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. तसेच कठोर कायदे ही केले आहेत. मात्र, मुलींचा जन्मदर वाढताना दिसत नाही. पण, कारखेडा ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयामुळे येथे मुलींचा जन्मदर वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी, असे निर्णय घेतल्यास मुलींचा जन्मदर वाढण्यास नक्कीच मदत होईल यात मात्र शंका नाही.

हेही वाचा - खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Last Updated : Mar 4, 2021, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.