वाशिम - उद्धव ठाकरे सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीचे उद्घाटन वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. फक्त 10 रुपयांमध्ये ही शिवथाळी मिळमआर आहे. यावेळी स्वतः पालकमंत्री यांनी लाभार्थ्यांना थाळी वाटप करत या योजनेची सुरूवात केली.
हेही वाचा - विद्यार्थ्यांनी ७५० सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती भरून वनराई बंधाऱ्याची केली निर्मिती
वाशिममधील रेल्वे स्थानक परिसरात 125 थाळीचे शिवभोजन योजना सुरु करण्यात आली आहे. तर 100 थाळींचे भोजनालय जिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरू करणयात आले आहे. या योजनेचा गोरगरीब जनतेला फायदा होईल, अशी आशा यावेळी देसाई यांनी व्यक्त केली.