ETV Bharat / state

पीकविमा कंपनीविरोधात शिवसेना आक्रमक; वाशिममध्ये रास्ता रोको

या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यानी कंपनीच्या प्रतिकात्मक प्रेतावर सोयाबीन, तूर टाकून निषेध व्यक्त केला.

author img

By

Published : Sep 8, 2019, 8:45 PM IST

पीकविमा कंपनी विरोधात शिवसेना आक्रमक

वाशिम - जिल्ह्यातील कारंजा शहरात शेकडो शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीचे प्रतिकात्मक मृतदेह तयार करून रास्ता रोको आंदोलन केले. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात चाललेल्या या आंदोलनामुळे एक तास वाहतूक ठप्प होती. या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यानी कंपनीच्या प्रतिकात्मक मृतदेहावर सोयाबीन, तूर टाकून निषेध व्यक्त केला.

वाशिममध्ये रास्ता रोको आंदोलन

हेही वाचा - कारंजामध्ये शस्त्रसाठा जप्त, तिघांना अटक

कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना 100 कोटी पीकविमा मिळणे आवश्यक होते. मात्र, आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने केवळ 1 कोटीच नुकसान भरपाई मंजूर केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविमा रक्कम मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे सुभाष राठोड यांनी सांगितले.

Intro:पीक विमाकंपनीच्या विरोधात मढं तयार करून शिवसेनेचा रास्ता रोको

अँकर : वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात पीकविमा कंपनी विरोधात शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी विमा कंपनीचं प्रतिकात्मक मढं तयार करून रास्ता रोको आंदोलन केलाय एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती..

या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यानी कंपनीच्या प्रतिकात्मक मढंयावर सोयाबीन,तूर टाकुन निषेध व्यक्त केला.कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकऱ्याना 100 कोटी पीकविमा मिळणे आवश्यक असतांना आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने केवळ एकच कोटी नुकसान भरपाई मंजूर करुन शेतकऱ्याची मोठी फसवणूक केली असून पीकविमा रक्कम मिळेपर्यन्त शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे डॉ सुभाष राठोड यांनी सांगितले....Body:पीक विमाकंपनीच्या विरोधात मढं तयार करून शिवसेनेचा रास्ता रोको
Conclusion:पीक विमाकंपनीच्या विरोधात मढं तयार करून शिवसेनेचा रास्ता रोको
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.