वाशिम - जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मनोरा येथे विजेचा कडकडाट तसेच जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर रस्त्यावर असलेल्या व्यावसायिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. जोरदार वाऱ्यामुळे मानोरा तालुक्यात वीजपुरवठा देखील खंडीत झाला आहे.