वाशिम - महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरातील ३५ गावांचा विद्युत पुरवठा खंडित मागील ३० तासापासून खंडित झाला आहे. हा विद्युत पुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही, तो औरंगाबाद- नागपूर द्रुतगतीमार्गावर बसून ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.
पोलीस प्रशासनच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे-
जिल्ह्याला पुराचा विळखा पडल्यामुळे ठिकठिकाणच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अनेक गावे अंधारात आहेत. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील 30 तासापासून जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरात 35 गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. प्रत्येक वर्षी होणाऱ्या या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी औरंगाबाद- नागपूर द्रुतगतीमार्गावर बसून ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासनच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
हेही वाचा - वाशिम येथे विहीर खचून एका मजुराचा मृत्यू ; दोन मजुर वाचले