ETV Bharat / state

Manora Nagar Panchayat Election 2021 : मानोरा नगर पंचायतच्या 13 जागांसाठी उद्या मतदान

मानोरा नगर पंचायतच्या 13 जागांसाठी उद्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 22 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. (Manora Nagar Panchayat Election 2021 )गरपंचायत क्षेत्रातील 13 प्रभागात होत असलेल्या निवडणूक 59 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे 13, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13, भाजपचे 8, शिवसेनेचे 12 वंचित बहुजन आघाडीचे 6, बसपाचे 2 अपक्ष 5 असे उमेदवार एकमेकांसमक्ष उभे ठाकले आहेत.

मानोरा नगर पचायत कार्यालय
मानोरा नगर पचायत कार्यालय
author img

By

Published : Dec 20, 2021, 12:06 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतच्या 13 जागांसाठी उद्या 21 डिसेंबर रोजी मतदान होणार (Manora Nagar Panchayat Election 2021) असून 22 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह भाजपा, वंचित स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली आहेत. यावेळी मानोरा नगर पंचायतवर कुणाची सत्ता स्थापन होते हे 22 डिसेंबरच्या निकालावरून दिसून येणार आहे.

सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर

वाशिमच्या मानोरा नगरपंचायत क्षेत्रातील 13 प्रभागात होत असलेल्या निवडणूक 59 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे 13, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13, भाजपचे 8, शिवसेनेचे 12 वंचित बहुजन आघाडीचे 6, बसपाचे 2 अपक्ष 5 असे उमेदवार एकमेकांसमक्ष उभे ठाकले आहेत. सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढत असून 21 ला मतदान आहे. (Nagar Panchayat Election 2021) आज प्रचार थंडावला असून घरोघरी भेटी देण्यासाठी चढाओढ लागली आहे. कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांची प्रतिष्ठा पणाला

मानोरा नगर पंचायत निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमेन्द्र ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, युसुफ पुंजानी, भाजप आमदार राजेंद्र पाटणी, शिवसेना खासदार भावना गवळी, जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहे.

मानोरा नगर पंचायत निवडणूक सद्यस्थिती

  • शिवसेना - 12 उमेदवार
  • राष्ट्रवादी - 13 उमेदवार
  • काँग्रेस - 13 उमेदवार
  • भाजप - 08 उमेदवार
  • वंचित - 06 उमेदवार
  • बसपा - 02 उमेदवार
  • इतर - 05 उमेदवार
  • मानोरा नगर पंचायत मागील परिस्थिती
  • एकूण सदस्य संख्या - 17
  • भाजपा - 2
  • सेना - 2
  • काँग्रेस - 4
  • राष्ट्रवादी - 1
  • वंचित - 7
  • इतर - 1

हेही वाचा - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.