वाशिम- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सफाई कामगार आणि पोलीस रात्रंदिवस कर्तव्य पार पाडत आहेत. रविवारी रात्री जिल्ह्यातील धनज बु.येथील चेकपोस्टवर पोलीस कर्तव्य बजावीत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मात्र, येथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी पावसातही चेकपोस्ट सोडले नाही. सुसाट्याच्या वादळी वाऱ्यात कर्तव्य पार पाडत वाहनांची तपासणी केली.
हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
रविवारी सायंकाळच्या सुमारास धनज येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अशातच धनज पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या ढंगारखेड चेकपोस्टवर वाऱ्याने पोलिसांची राहुटी उडाली. तसेच रस्त्यावर असलेले बॅरिगेट्स सुद्धा दूरवर उडून जाऊन पडले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सुसाट्याच्या वादळी वाऱ्यात अनेक वाहनांची तपासणी करुन राहुटी तसेच बॅरिगेट्स हवेत उडून जाताना वाचविले.
कोरोना सारख्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस कर्मचारी मोठ्या धैर्याने कर्तव्य पार पाडत आहेत. स्वतःजीव मुठीत घेऊन धनज येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी वादळीवाऱ्यात कर्तव्य पार पाडले.