वाशिम- येथील मंगरुळपीर पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारावर शहरातील अशोकनगर भागातून एका व्यक्तीडून शस्त्रे जप्त केली आहेत. आरोपीचे नाव आकाश उर्फ आक्या सीताराम वायले असे आहे. आरोपीला अटक करण्यात आले आहे.
हेही वाचा-पीकविमा कंपनीविरोधात शिवसेना आक्रमक; वाशिममध्ये रास्ता रोको
मंगरुळपीर शहरातील अशोकनगर भागातील एक व्यक्तीच्या घरी विना परवाना शस्त्रसाठा असल्याची माहिती, पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या घरी छापा मारला. त्याच्या घराच्या मागील स्वयंपाक खोलीत लोखंडी कपाटा मागे एक तलवार, एक लोखंडी कोयता, लोखंडी पाईप व रामपुरी चाकू असा एकून ४४५० रुपयांचे शस्त्र सापडले. अवैद्यरित्या व विनापरवाना लपवून ठेवलेली ही शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली. आरोपी आकाश उर्फ आक्या सीताराम वायले वय २८ याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.