ETV Bharat / state

पोहरादेवी: संत सेवालाल महाराज यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी

बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती आज पोहरादेवी येथे साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी जयंतीनिमित्त लाखो भाविक पोहरादेवी येथे येतात, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने ही जयंती साजरी करण्यात आली.

author img

By

Published : Feb 15, 2021, 7:51 PM IST

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

वाशिम - बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती आज पोहरादेवी येथे साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी जयंतीनिमित्त लाखो भाविक पोहरादेवी येथे येतात, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पोहरादेवी गावातून सेवालाल महाराजांची मिरवणूक देखील काढण्यात आली.

जिल्ह्यातील बंजारा बांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या जन्मोत्सवासाठी देशभरातील हजारो बंजारा समाजबांधव आज पोहरादेवीमध्ये दाखल झाले. जयंतीनिमित्त सेवालाल महाराजांच्या पालखीची पोहरादेवी गावातून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी अनेक दिंड्या पोहरादेवी येथे दाखल झाल्या होत्या.

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

घरीच राहून जयंती साजरी करण्याचे आवाहन

दरवर्षी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी येथे देशभरातून पाच लाखाहून अधिक भाविक येतात, मात्र यंदा कोरोनामुळे पोहरादेवी येथील महंतांनी जिथे आहात तिथूनच जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे भाविकांनी सेवालाल महाराजांची जयंती घरीच साजरी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.