वाशिम - रिसोड-नागपूर शिवशाही बसमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. हिरालाल कावडे (वय ४० वर्ष) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. त्यांची प्रवासादरम्यान प्रकृती अचानक खालावली. चालकाने तात्काळ बस सामान्य रुग्णालयाच्या दिशेने वळवली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - वाशिम: लक्झरी बसच्या खाली आढळले दोन दिवसांचे पुरुष जातीचे बाळ
मृतक हिरालाल कावडे मध्यप्रदेशातील बुध्दू कचरबोथ बडगाव येथील रहिवासी होते. हिरालाल अनेक दिवसांपासून आजारी असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून देण्यात आली. हिरालाल हे जळगाव येथील कला पथकामध्ये काम करायचे. वाशिम जिल्ह्यातील लोणी येथे कला पथकाच्या सोबत ते आले होते.
हेही वाचा - हैदराबादमध्ये बसच्या धडकेत मुंबईतील इंजिनीअर तरुणीचा मृत्यू
त्यांची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी शिवशाहीने त्यांना अमरावतीला नेण्यात येत होते. वाशिम बसस्थानकाला बस थांबली असता ते बेशुध्द अवस्थेत असल्याचे बसमधील प्रवाशांनी चालकाला सांगितले. त्यानंतर तात्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तपासल्यानंतर डॉक्टरांनी हिरालाल यांना मृत घोषित केले.