वाशिम - दरवर्षी राज्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होते. ती दूर करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येऊन शासनाचा कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जातो. मात्र बऱ्याच गावात निधी खर्च करूनही प्रत्यक्षात गरजूंना पाणी मिळतच नाही. मात्र अती महत्वाच्या असलेल्या घटकासाठी म्हणजेच महिलांना असलेल्या पाण्याची गरज लक्षात घेऊन कोणताही राज्यकर्ता अजून तरी दिसला नाही. पाणी टंचाई या समस्येवर मात करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील दुबळवेल गावातील महिला बचत गटातील महिलांनीच पुढाकार घेतला आहे. आपल्याकडे असलेला बचत गटाचा निधी ग्रामपंचायतला देऊन या महिलांनी यंदा तरी तात्पुरती पाणी समस्या निकाली काढली आहे. मात्र या गावाकडे जिल्हा परिषदने गांभीर्याने लक्ष देउन कायमस्वरूपी पाणी समस्या निकाली काढावी, अशी बचत गटांतील महिलांसह नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.
महिलांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू - उन्हाळा लागला की ग्रामीण भागात पाणी समस्या निर्माण होऊन प्रशासन पाणी समस्येकडे लक्ष द्यायला लागते. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील दुबळवेल या गावात महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण ची पाणी पुरवठा योजना १९९२ ला म्हणजेच ३० वर्षांपासून कार्यान्वित झाली. या योजनेसाठी लाखो रुपयांचा चुराडाही झाला. मात्र गावात पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही. यंदा जिल्ह्यात पावसाचे पाणी सरासरी पेक्षा जास्त झाल्यामुळे गावशेजारी असलेल्या नैसर्गिक व मानवनिर्मित जलस्त्रोतांत वाढ झाली आहे. ग्रामपंचायतकडे निधी उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतने गावातील महिलांच्या बचत गटांची मिटिंग घेऊन आर्थिक सहकार्याची मागणी केली. पाण्याची काळजी महिलांनाच असल्याने महिलांनी आपली जमापुंजी बँकेतून काढत ग्रामपंचायतकडे सुपूर्द केली. आणि काही वेळातच पाणी टंचाईग्रस्त गावात गंगा बहरली. परिणामी महिलांच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू फुलले.
पाणी टंचाईचे केले निवारण - केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची धूळधाण करीत ग्रामीण भागात मोठी जनजागृती करताना दिसत आहे. मात्र ज्या गावात सर्वकाही उपलब्ध असूनही फक्त नियोजनाअभावी ही गावे अजूनही भीषण पाणी टंचाईच्या गर्तेत अडकली आहेत. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास जिल्ह्यातील अशा ७५ टक्के गावात कायमस्वरूपी पाणी टंचाईचे निवारण केल्या जाऊ शकते यात मात्र शंका नाही.
हेही वाचा - नरेंद्र मोदी सरकारच्या 8 वर्षात सर्वसामान्यांना काय मिळाले?
हेही वाचा - Throated Lizard : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पठारावर आढळला रंगीत गळ्याचा सरडा, पाहा सुंदर फोटो
हेही वाचा - Goat Farming Success Story : सावित्रीची गरुड झेप; महिलांची शेळी पालन संस्थेतून एक करोडची उलाढाल