वाशिम - विदर्भातील पाच जिल्ह्यात कोव्हीड लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या केवळ तीन दिवस पुरतील एवढ्याच लशीचा साठा उपलब्ध आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लशीचा साठा केवळ तीन दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे.
आरोग्य विभागद्वारे लसीची मागणी
या पाच जिल्ह्यात एका दिवसात 20 हजार लस टोचल्या जातात. परंतु, सध्या एकूण 52 हजार 400 लशी उपलब्ध आहेत. गेल्या चार पाच दिवसांपासून आरोग्य विभाग लसीची मागणी करत आहे.
पाच जिल्ह्यासाठी केवळ 16 हजार लस
18 लाख 45 हजार लशीची मागणी पाच जिल्ह्यासाठी करण्यात आलीय मात्र केवळ 16 हजार लस मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या पाचही जिल्ह्यात लसींचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. तर कोरोना वर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची मोठी दमछाक होते आहे.
सद्यस्थितीत पाचही जिल्ह्यातील आकडेवारी
अकोला - 9700
बुलडाणा- 36054
वाशिम - 2840
यवतमाळ - 9240
हेही वाचा - परभणी जिल्ह्यात डिवायएसपींच्या जीपला अपघात; ठेकेदारासह अभियंत्यावर गुन्हा दाखल