वाशिम - शहरातील मदार साहब दरगाह जवळ असलेल्या विहिरीत शनिवारी तरुणाने उडी मारून आत्महत्त्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव दिलीप गाभणे (२२, रा.शुक्रवार पेठ) असे असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तरुणाने मदार साहब दरगाह जवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिते हे घटनास्थळी दाखल झाले. यानंतर परिसरातील नागरिकांनी मदत कार्य करून दिलीपचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. घटनेचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत.