वाशिम - आजपासून वाशिम जिल्ह्यातील रविवारचा लॉकडाऊन हटविण्यात आल्यानं वाशिम शहरातील बाजारपेठेत सकाळी 9 वाजल्यापासून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आली. कोरोनाच्या सर्व उपाययोजनांना हरताळ फासला जात आहे. बाजारातील दुकाने आणि प्रतिष्ठानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना देखील दुकानदार आणि ग्राहक कोणतीही खबरदारी घेताना दिसून येत नाहीत.
वाशिम जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्ण संख्या 100 च्या वर -
वाशिम जिल्ह्यात कोरोना रूग्णच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. वाशिम जिल्ह्यात दरदिवशी 100 वर कोरोना रुग्ण आढळत आहे विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात असले तरी नागरिक याकडे लक्ष देत नाही.