वाशिम - शहरात संकल्प बहुउद्देशीय संस्था आणि सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील सर्वच महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून त्यांचे पूजन करण्यात आले.
वेगवेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मात्र, वाशिममध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यासह शहरातील सर्वच पुतळे स्वच्छ करण्यात आले. तसेच त्यांचे पूजनही करण्यात आले. तसेच सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक संस्थांच्या या वेगळ्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.