ETV Bharat / state

नागरतासमध्ये वृद्ध महिलेची हत्या

नागरतास परिसरात नाल्याच्या काठावर एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रमिलाबाई केशव देवळे वय ५५ वर्ष असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागरतासमध्ये वृद्ध महिलेची हत्या
नागरतासमध्ये वृद्ध महिलेची हत्या
author img

By

Published : Mar 10, 2021, 4:09 PM IST

वाशिम - नागरतास परिसरात नाल्याच्या काठावर एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रमिलाबाई केशव देवळे वय ५५ वर्ष असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत महिला ही सहा महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या विजय देवळे यांची आई आहे, त्यामुळे या घटनेबाबत चर्चांना उधान आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागरतास गावाशेजारी एका नाल्याच्या काठावर एक महिला मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेचा दोरीने गळा आवळून आणि डोक्यात जड वस्तू मारून खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान घटनेचा तपास सुरू असून, पोलिसांनी मृत महिलेच्या सुनेचा देखील जबाब घेतला आहे.

नागरतासमध्ये वृद्ध महिलेची हत्या

आरोपीचा तपास सुरू असल्याची माहिती

दरम्यान या हत्येचा तपास सुरू आहे, आतापर्यंत हा खून कसा झाला, कोणी केला? याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र लवकरच आरोपीचा शोध घेऊ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे, मात्र या हत्येबाबत गावात उलटसूलट चर्चा असून, गावात कोणीच बोलायला तयार नसल्याने, या हत्येचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.