ETV Bharat / state

वाशीम जिल्ह्यातील पिता-पुत्राने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा - 360 एक्सप्लोरर

7 नोव्हेंबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10 वाजता या दोघांनी किलीमांजारो गिलमन्स पॉइंटवर पाऊल ठेवले. मूळचे वाशीम जिल्ह्यातील असलेले मंत्री बापलेकांनी जिल्ह्यातील प्रथम आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला आहे.

किलीमांजारो
author img

By

Published : Nov 12, 2019, 5:03 AM IST

वाशिम - आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोच्या गिलमन्स पॉईंटवर भारताचा तिरंगा फडकवून जिल्ह्यातील पिता-पित्रांनी इतिहास रचला आहे. आरव मंत्री आणि शिवलाल मंत्री पेडगाव (रा. पेडगाव, ता. रिसोड, जि. वाशिम) असे या पिता पुत्रांचे नाव आहे. महाराष्ट्रातील यशस्वी ऍडव्हेंचर कंपनी 360 एक्सप्लोरर मार्फत आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावरील ही मोहिम आयोजीत करण्यात आली होती.

किलीमांजोरोच्या शिखरावरील दृष्ये

किलीमांजारो हे आफ्रिकेतील टांझानिया देशातील शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341 फूट एवढी आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 ला हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या गिर्यारोहक आरव मंत्री आणि त्याचे वडील शिवलाल मंत्री यांनी हे शिखर सर केले आहे.

7 नोव्हेंबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10 वाजता या दोघांनी किलीमांजारो गिलमन्स पॉइंटवर पाऊल ठेवले. मूळचे वाशीम जिल्ह्यातील असलेले मंत्री बापलेकांनी जिल्ह्यातील प्रथम आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला आहे. सध्या मंत्री कुटुंब कामानिमित्त नाशिक येथे राहातात.

शून्याच्या खाली तापमान,घोंगावत वाहणारे वारे, उभी चढण या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी 2 नोव्हेंबरला सुरवात केली होती. आरव हा इयत्ता सातवी मध्ये शिकत असून आई शिवानी मंत्री या त्याची सर्वात मोठी प्रेरणा असल्याचे तो सांगतो.

Intro:वाशीम जिल्ह्यातील पिता-पत्राने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो गिलमन्स पॉईंट वर फडकवला तिरंगा

वाशीम : महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी ऍडव्हेंचर कंपनी 360 एक्सप्लोरर मार्फत आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राचे मूळ पेडगाव ता. रिसोड जि. वाशिम येथील 12 वर्षाच्या आरव मंत्री व त्याचे वडील शिवलाल मंत्री यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोच्या गिलमन्स पॉईंटवर भारताचा तिरंगा फडकवून इतिहास रचला आहे. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता या दोघांनी किलीमांजारो गिलमन्स पॉइंटवर पाऊल ठेवले. मूळचे वाशीम जिल्ह्यातील असलेले मंत्री बापलेकांनी जिल्ह्यातील प्रथमच आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला आहे. सध्या मंत्री कुटुंब कामानिमित्त नाशिक येथे राहात आहे.

आफ्रिकेतील टांझानिया  देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेले बालगिर्यारोहक आरव मंत्री व त्याचे वडील शिवलाल मंत्री दोघांनी हे शिखर सर केले आहे.

शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी सुरवात केली होती. आरव हा इयत्ता सातवी मध्ये शिकत असून आई शिवानी मंत्री यांची सर्वात मोठी प्रेरणा आहे असे तो म्हणतो.
Body:वाशीम जिल्ह्यातील पिता-पत्राने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो गिलमन्स पॉईंट वर फडकवला तिरंगाConclusion:वाशीम जिल्ह्यातील पिता-पत्राने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो गिलमन्स पॉईंट वर फडकवला तिरंगा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.