वाशिम - वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम खडकी येथील एका 25 वर्षीय विवाहितेचा तिच्या तीन वर्षीय चिमुकल्या सह गावातील सार्वजनिक विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची जाऊळका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
ग्राम खडकी येथील लता उर्फ सोनू गजानन नागरे (वय-25) ही तिचा तीन वर्षीय मुलगा आर्यनला घेऊन पाणी आणण्यासाठी गेली होती. मुलगा विहिरीत पडल्याने तिनेसुद्धा विहिरीत उडी मारली. या घटनेत मायलेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची लताच्या वडीलांनी जाऊळका पोलीस ठाण्याला माहिती दिली.