वाशिम - कोरोनाच्या संकटामुळे अनेक गोष्टी प्रभावित झाल्या आहेत. ऐन लग्नसराईतच लॉकडाऊन झाल्याने अनेक नियोजित विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. तर काही जण सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून घरच्याघरी विवाह आटोपून घेत आहेत. याचप्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत केवळ 5 जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला.
सोनखास येथील ऋषीकेश कव्हर तर गिव्हा येथील पल्लवी यांचा विवाह प्रचलित चाली रितीला फाटा देत घराच्या घरी अतिशय साधेपणाने संपन्न झाला. विवाह आटोपल्यावर स्वतः वर आपल्या नववधूला दुचाकीवर बसवून घेऊन गेला. या परिस्थितीत अशाप्रकारे कमी जणांच्या उपस्थितीत विवाह करावा, अशी अपेक्षा यावेळी नवोदित वर-वधूकडून व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा - कोरोनाचा फटका; 'त्या' चुकीच्या अफवांमुळे सलून व्यावसायिक धास्तावले...
ऐन लग्न सराईच्या दिवसातच लॉकडाऊन झाल्याने यंदाचे अनेक नियोजित विवाह समारंभ स्थगित करण्याची वेळ आली आहे. तर काही ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत नियमांचे पालन करत अतिशय सध्या पद्धतीने आदर्श विवाह संपन्न होत आहेत.