ETV Bharat / state

वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे प्रचंड नुकसान, सरकारकडून मदतीची मागणी

बदलते हवामान आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी मिळण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे.

अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे नुकसान
author img

By

Published : Apr 5, 2019, 1:15 PM IST

वाशिम - जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा बागेचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधीकच भर पडली आहे. मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला शासनाने सर्वे करून त्वरित मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे नुकसान

कोकण पाठोपाठ वाशिम जिल्ह्यातही आंबा बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाशीम येथील सुनील लोनसुने यांनी मोठ्या कष्टाने ५ एकरावर आंब्याची बाग लावली. तर मागील ५ वर्षापासून ते आंबा बागेचे व्यवस्थापन करत आहेत. यामधून त्यांना किमान १५ लाख रुपये उत्पन्नाची आशा होती. मात्र, बदलते हवामान आणि गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसाने विक्रीला आलेला आंबा गळून गेला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंब्याची बाग ७० टक्के नष्ट झाले. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीचा सर्वे करून शासनाने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

Intro:अँकर : वाशीम जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा बागेचे प्रचंड नुकसान झाले.यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधीकच भर पडली आहे. मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला शासनाने सर्वे करून त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे...
Body:व्हिओ :- कोकण पाठोपाठ वाशीम जिल्ह्यात ही आंबा बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाशीम येथील सुनील लोनसुने यांनी मोठ्या कष्टाने पाच एकरावर आंब्याची बाग लावली मात्र बदलते हवामान आणी काल झालेल्या अवकाळी पावसाने विक्रीला आलेला आंबा गळून गेला आहे.त्यामुळं मोठे नुकसान झाले आहे.....Conclusion:व्हिओ : गेल्या पाच वर्षापासून अंबा बागेचे व्यवस्थापन करणाऱ्या सुनील लोनसुने यांना किमान १५ लाख रुपये उत्पन्नाची अशा होती. मात्र काल रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अब्याची बाग ७०% नष्ट झाल्याने फळबाग उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीचा सर्वे करून शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.....

व्हिओ : बदलते हवामान आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. कधी असमानी तर कधी सुलतानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी मिळण्यासाठी गरज आहे सरकारी मदतीची...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.