वाशिम- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख हे उपस्थित होते.