वाशिम - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नर्सिंग स्कूल आणि शालेय विद्यार्थ्यांनी वाशिम शहरात कुष्ठरोग जनजागृती रॅली काढली आहे. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातून या रॅलीची सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली सामान्य रुग्णालय परिसरात पोहोचल्यावर तिचा समारोप करण्यात आला.
हेही वाचा - वाशिम जिल्हा परिषदेच्या 4 सभापती पदांची बिनविरोध निवड
या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्यात आली.