वाशिम - जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला आहे. स्वतः करोनाबाधित असताना लॅब टेक्निशियनने १०० रुग्णांचे एक्स रे काढल्याचे समोर आल्याने हे सर्वजण हादरले आहेत. नाथ डिजिटल एक्स रे लॅबचा टेक्निशियन असलेला राहुल शिरसाट याने हा प्रताप केला असून महसूल प्रशासन, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनने संयुक्तरित्या कारवाई करत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही लॅबही सील करण्यात आली आहे.
धक्कादायक.. करोनाबाधित असताना लॅब टेक्निशियनने १०० रुग्णांचे काढले एक्स-रे, लॅब सील - वाशिम कोरोना अपडेट
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला आहे. स्वतः करोनाबाधित असताना लॅब टेक्निशियनने १०० रुग्णांचे एक्स रे काढल्याचे समोर आल्याने हे सर्वजण हादरले आहेत.
patients-x-ray-while-corona-positive-in-washim
वाशिम - जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला आहे. स्वतः करोनाबाधित असताना लॅब टेक्निशियनने १०० रुग्णांचे एक्स रे काढल्याचे समोर आल्याने हे सर्वजण हादरले आहेत. नाथ डिजिटल एक्स रे लॅबचा टेक्निशियन असलेला राहुल शिरसाट याने हा प्रताप केला असून महसूल प्रशासन, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनने संयुक्तरित्या कारवाई करत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही लॅबही सील करण्यात आली आहे.
लॅब उघडल्यानंतर राहुल शिरसाटने 100 हून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्या जीवाशीच एकप्रकारे खेळ केला. पैसे कमावण्याच्या हेतूने त्याने ही कृती केली. शुक्रवारी मंगरूळपीर नगरपरिषद प्रशासनाला याप्रकाराची माहिती प्राप्त झाली. त्यावरून नगरपरिषद, पोलीस, महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. लॅब टेक्निशियन राहुल शिरसाट याला कोविड सेंटरला भरती करण्यात आले आहे तर नाथ डिजिटल एक्स रे लॅब तात्काळ सील करण्यात आली आहे. पोलिसांकडून राहुल शिरसाटवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.