वाशिम - अंध विद्यालयात राखीपौर्णिमेनिमित्त विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिम यांच्यावतीने अंध मुलांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा बहीण-भावातील प्रेम वाढवणारा सण असल्याने यानिमित्ताने विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिम यांच्यावतीने विद्यार्थ्यांसमवेत हा सण साजरा करून त्यांना खाऊच्या वस्तू देण्यात आल्या.
अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याच्या हेतुने राखीपौर्णिमेनिमित्त विश्व हिंदू दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिम याच्या वतीने रक्षा बंधन साजरे करण्यात आले. या वेळी अंध विद्यार्थ्यांनी देशभक्ती व रक्षाबंधन यावर गीत गायली. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिमचे सदस्य उपस्थित होते.