वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव मंगरूळपीर तालुक्यात शुक्रवारी रात्री 8 वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच वेळी मंगरूळपीर तालुक्यात गारपीट झाली. त्यामुळे पिकांना त्याचा फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्यांनी शेतातील सोयाबीनची काढणी तसेच वाळण्यासाठी ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले आहे.
मंगरुळपिर तालुक्यातील खराबी पिंप्री येथिल कृष्णराव ठाकरे यांच्या शेतात पाणी गेले आहे. याचप्रमाणे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरल्या शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांना पाणीही दिसत नाही.
हेही वाचा - भाविकांची प्रतीक्षा संपली! 7 ऑक्टोबरपासून शेगावमधील गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी होणार खुले!