वाशिम - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रमाणात कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. पण, कोरोना चाचणी करण्यात येत असलेल्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत. त्यातच आरोग्य कर्मचारी पीपीई किट न वापरता चाचणी करत असल्याचा प्रकार समोर आला असून प्रशासकीय नियमावली बगल दिल्याचे दिसून येत आहे.
वाशिम नगर परिषदेच्यावतीने व्यापाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले असून त्या पध्दतीने नियोजनही केले. व्यापाऱ्यांसाठी व दुकानात काम करणाऱ्या व्यक्तिंसाठी केमिस्ट भवन व सरदार वल्लभभाई पटेल शाळेत नियोजन करण्यात आले आहे. पण, शहरातील नागरिकांना कोरोना चाचणी करण्याच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असून येथे सर्व कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी तासंतास थांबण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतात. असेच नागरिक येथे येत आहेत. मात्र, आरोग्य विभागाच्यावतीने टेस्ट करणारे कर्मचाऱ्यांना पीपीई किट न वापरता कोरोना चाचणी करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
हेही वाचा - कोरोनाकाळात डॉक्टरांचा हलगर्जीपणा; जऊळका प्राथमिक रुग्णालयात डॉक्टरच गैरहजर`
हेही वाचा - वाशिममधील बियर बार, दारू दुकाने २५ टक्के बैठक क्षमतेने सुरू राहणार