ETV Bharat / state

वाशिम : पदभरतीसह विविध मागण्यांकरता परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन

author img

By

Published : Sep 2, 2020, 3:46 PM IST

राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. मात्र, रुग्णांचे प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यात परिचारिका पद भरतीसह अन्य मागण्यांकरता काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आले.

परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन
परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन

वाशिम : परिचारिका पद रिक्त असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे राज्यातील परिचारिका पद भरती 100 टक्के करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील परिचारिकानी आज(बुधवार)पासून सात दिवस काळ्या फिती बांधून काम सुरू केले आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आठ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशाराही यावेळी परिचारिकांनी दिला आहे.

परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन

राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. मात्र, रुग्णांचे प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यात परिचारिका पद भरतीसह अन्य मागण्यांकरता काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान राज्यातील परिचारिका पद भरती 100 टक्के करावी, केंद्राप्रमाणे नावात बदल झाला पाहिजे, ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त काम दिले आहे ते थांबवण्यात यावे, केविड सेंटरमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना 7 दिवस क्वारंटाईन व रोटेशन दिला पाहिजे अशी मागणी यावेळी परिचारिकांनी केली आहे. सरकारने मागण्या वेळीच मान्य केल्या नाहीत तर 8 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

हेही वाचा - वाशिममध्ये माजी सरपंचाची दगडाने ठेचून हत्या, तिघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.