ETV Bharat / state

धक्कादायक..! पुण्याला जाणाऱ्या खासगी बसमध्ये तरुणीवर बलात्कार - वाशिम गुन्हे बातमी

गोंदियाहून पुण्याला जाणऱ्या एका तरुणीवर धावत्या बसमध्ये बसच्या क्लिनरने चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची घटना 6 जानेवारीला घडली आहे. याबाबत तरुणीने पुणे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे.

बस
बस
author img

By

Published : Jan 11, 2021, 3:12 PM IST

Updated : Jan 11, 2021, 4:02 PM IST

वाशिम - गोंदियाहून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीचा धावत्या खासगी बसमध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना 6 जानेवारीला घडली आहे. यबाबत मुलीने पुण्यात पोहोचल्यानंतर तक्रार दिली आहे.

माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक

चाकूचा धाक दाखवत केला बलात्कार

पीडित तरुणी ही मुळची गोंदिया येथील राहणारी असून ती पुणे येथे नोकरी करते. नोकरीसाठी ती गोंदियाहून पुण्याला खासगी बसमध्ये प्रवास करत होती. त्यावेळी आसन क्रमांक तुमचा नसल्याचे कारण सांगत समीर देवकर या व्यक्तीने मागच्या आसनावर बसविले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता नराधमाने आरडाओरडा केल्यास धावत्या वाहनातून फेकून देण्याचीही धमकी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बस जप्त

पीडित तरुणीने पुणे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा वाशिम पोलिसांकडे वर्ग केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत ज्या बसमध्ये अत्याचार झाला ती 'गुडविल्स कंपनी'ची बस जप्त केली आहे. समीर देवकर, असे आरोपीचे नाव असून तो बसचा क्लिनर आहे. मालेगाव पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - खडकी येथील मायलेकाचा विहिरीत पडून मृत्यू

हेही वाचा - वाशिम : शेततळ्यात बूडून दहा वर्षीय मूलाचा मृत्यू

Last Updated : Jan 11, 2021, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.