वाशिम- मानाेरा तालुक्यातील शेंदुरजना येथे पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या पित्याला बारा मुलींनी खांदा देवून साश्रू नयनांनी अंतिम निराेप दिल्याची घटना घडली. ग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजविणारे सखाराम गणपतराव काळे यांचे गुरुवारी वृध्दापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मृत्यूनंतर मुलाला कराव्या लागणाऱ्या सगळ्या विधी या १२ मुलींनी करत आपले कर्तव्य बजावले. त्यामुळं परिसरात हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
सखाराम काळेंमुळे ग्रामीण भागात रोवली शिक्षणाची मुहूर्तमेढ
सखाराम काळे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३४ राेजी त्यांचामानाेरा तालुक्यातील शेंदुरजना येथे सधन कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची ओढ हाेती. आपले चुलत बंधू नामदेवराव काळे यांच्या साेबतीने ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ राेवली. खेड्यातील मुलांना उच्च शिक्षण गावातच मिळावे या ध्येयाने ते प्रेरीत हाेते. आज आप्पास्वामी शिक्षण संस्थेचा हाेत असलेला लाैकीक सखाराम आणि नामदेवराव काळे यांच्या याेग्य नियाेजनाचे फलित हाेय.
१२ मुलींनी बजावले मुलाचे कर्तव्य
सखाराम काळे गत काही दिवसांपासून वृध्दापकाळाने आजारी हाेते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. सखाराम यांना १२ मुलीच आहे. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारा मुलींनी पुढाकार घेतला. सखाराम यांच्या मृतदेहाला स्मशामभूमीपर्यंत खांदा मुलींनीच दिला. एवढेच नव्हे तर त्यांच्या मृतदेहाला अग्नीही मुलींनीच दिला.