ETV Bharat / state

कारंजामध्ये चार किलो गांजा जप्त, आरोपीला अटक

कारंजामध्ये पोलिसांनी 4 किलो गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.सलीम खान असद खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

author img

By

Published : Nov 7, 2020, 7:52 PM IST

Four kg Hemp seized in Karanja
कारंजामध्ये चार किलो गांजा जप्त

वाशिम - कारंजामध्ये पोलिसांनी 4 किलो गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सलीम खान असद खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपी दुचाकीवर दारव्ह्याकडून कारंजाकडे येत असताना पोलिसांनी त्याला वाटेत अडवले व त्याची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना त्याच्याकडे चार किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गर्दशनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने केली.

हेही वाचा - दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची आत्महत्या; अमरावतीच्या ममदापूर येथील घटना

हेही वाचा - 'यासाठी' शाम इंडो फॅब कंपनीमध्ये युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.