वाशिम - मानोरा येथील पंचायत समितीच्या जीवन शिक्षण विभागाच्या इमारतीमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जुनी कागदपत्रे, कचरा वाहनांचे टायर, लाकडी खिडक्या, दरवाजे, जुने कपाट जळून खाक झाले आहे.
हेही वाचा - जाती-धर्माच्या भिंती मोडून कोल्हापूरात पार पडला हिंदू-मुस्लिम विवाह सोहळा
एक तासांनंतर आगीवर नियंत्रण
सध्या बीआरसीचे कामकाज नव्या इमारतीत सुरू असल्यामुळे जुनी इमारत गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. जुन्या इमारतीला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील काही नागरिक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर अग्निशामन दलाने घटनास्थळी धाव घेत तब्बल एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या आगीत काहीच अंतरावर असलेल्या महिला व बालकल्याण कार्यालयास कुठलीही हानी पोहोचली नाही.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरूच; 8646 नवे रुग्ण, 18 जणांचा मृत्यू