ETV Bharat / state

कसाई बाप ! मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षे शिक्षा भोगून आलेल्या पित्याचा दुसऱ्या मुलीवर अत्याचार - कारावास

नराधम पिता स्वत :च्या मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षाचा कारावास भोगून 2 महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला होता.

कसाई बाप ! मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षे शिक्षा भोगून आलेल्या पित्याचा दुसऱ्या मुलीवर अत्याचार
author img

By

Published : Jul 23, 2019, 6:02 PM IST

Updated : Jul 23, 2019, 7:31 PM IST

वाशिम - येथील एक नराधम बाप स्वत:च्या मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षाचा कारावास भोगून 2 महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर याच नराधम बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची तक्रार पीडित मुलीने वाशिम ग्रामीण पोलिसांत दिली आहे.

कसाई बाप ! मुलीच्या हत्येप्रकरणी 7 वर्षे शिक्षा भोगून आलेल्या पित्याचा दुसऱ्या मुलीवर अत्याचार

वाशिम तालुक्यात आरोपी पिता राहातो. त्याला काही वर्षांपूर्वी एक बेवारस मुलगी सापडली होती. या मुलीचा त्याने 2 वर्षे सांभाळही केला. त्यानंतर एके दिवशी दारुच्या नशेत त्याने या मुलीची हत्या केली. या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी लक्ष्मणला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. त्यानंतर 2 महिन्यांपूर्वीच लक्ष्मण तुरुंगातून बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

लहान असतानाच पीडीतेच्या आईचा मृत्यू -

लहान मुलीच्या हत्येच्या गुन्ह्याची लक्ष्मण शिक्षा भोगत असताना तिच्या आजोबाने मुलीचा सांभाळ केला. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच नराधम बापाने हे घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून या बापाला अटक करण्यात आली असल्याचे ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी सांगितले.

'असा' आला उजेडात प्रकार -

नराधम पित्याने सुरुवातीला एक महिना मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो काही महिने कामासाठी पुण्याला गेला होता. त्यानंतर त्या नराधमाने परत मुलीवर अत्याचार करण्यास सुरूवात केली. सोमवारी रात्रीच्या वेळी नराधम पिता मुलीला बाहेर घेऊन जात होता. त्यावेळी मुलगी जोरात रडत असल्याचे पाहून मुलीचे चुलत आजोबा आणि चुलत्याने मुलीला आजचा दिवस आमच्याकडे राहू दे, असे सांगून मुलीला घरी ठेवून घेतले. त्यावेळी त्या रात्री मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. तसेच मुलीने त्यांना पोलिसांत तक्रार देण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. त्यानंतर मुलीने नराधम पित्याविरोधात तक्रार दाखल केली.

Intro:लहान मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षाचा कारावास भोगून आलेल्या पित्यानेच केलं दुस-या मुलीवर शारीरिक अत्याचार

वाशिम : नराधम पित्याने स्वत : च्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षाचा कारावास भोगून दोन महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आलेल्या नराधम पित्याने १५ वर्षाच्या आपल्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेची तक्रार पीडित मुलीने वाशिम ग्रामीण पोलिसांत दिली आहे.

वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथे लक्ष्मण शिंदे राहातो. याला काही वर्षांपूर्वी एक बेवारस मुलगी सापडली. या मुलीचा दोन वर्ष त्याने सांभाळही केला. त्यानंतर एक दिवस दारुच्या नशेत त्याने या मुलीची हत्या केली. चिमुकलीच्या हत्येप्रकरणी लक्ष्मणला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. तो दोन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर बाहेर आल्यावर त्याने स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
पिडीत मुलीच्या आईचा ती लहान असतानाच मृत्यू झाला. 

लहान मुलीच्या हत्येच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना आजोबाने पीडित मुलीचा सांभाळ केला. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच नराधम बापाने हे घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरुन या बापाला अटक करण्यात आल्याचं ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी सांगितलं.Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड : सोबत आहे
Last Updated : Jul 23, 2019, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.