वाशिम- दरवर्षी रमजानमध्ये कलिंगडाला चांगले दर मिळतात. त्यामुळे, जिल्ह्यातील झाकलवाडी येथील रामकिसन काळबांडे या शेतकऱ्याने यंदा ४ एकरावर कलिंगडाची लागवड केली. आता कलिंगड कापनीला आला आहे. मात्र, देशात कोरोनाचे सावट आहे. त्यात कलिंगडाला व्यापारी ४ रुपये किलो दराने मागणी करीत आहे. पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतात उगवलेले कलिंगड स्वतः च विकायचे, असे शेतकरी काळबांडे यांनी ठरवले आहे.
काळबांडे हे आपल्या शेतातील कलिंगड १० रुपये प्रति किलो प्रमाणे ग्राहकांना विकणार आहे. त्यांनी आपल्या शेतातील कलिंगड ग्राहकांना थेट घरपोच देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे, त्यांना ४ एकरातील १४ टन कलिंगडाचे १४ लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल शेतकऱ्यांनी स्वतः विक्री केल्यास त्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होतो. त्यामुळे, प्रत्येक शेतकऱ्यांनी माझ्याप्रमाणे विक्री करावी, असे आवाहन काळबांडे यांनी केले आहे.
हेही वाचा- डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्दी, खोकला, तापाचे औषधे मिळणार नाहीत, मेडिकलकडून खबरदारी