वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. याचा सर्वात जास्त फटका फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात ग्राहक मिळत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी येथील रामकिसन काळबांडे यांनी सहा एकरातील कलिंगडावर ट्रॅक्टर फिरविला आहे. त्यामुळे त्यांचे 14 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रामकिसन काळबांडे यांनी कलिंगड लागवडीसाठी घेतलेले कर्ज फिटणार नसल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.