वाशिम - जिल्ह्यातील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज (दि. 20) निवडणूक होऊ घातली आहे. आज सकाळी आठ वाजता जिल्ह्यात सहा ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी दिग्गज नेते, आजी-माजी संचालक आमने-सामने उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाला हार पत्करावी लागणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून यामध्ये विविध स्वरूपातील 21 संचालक पदांसाठी होत असलेल्या या निवडणूकीत 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात रिसोडमधून विद्यमान आमदार अमीत झनक, मंगरूळपीरमधून माजी आमदार सुभाषराव ठाकरे आणि वामनराव देशमुख (रिसोड) या तीघांचा समावेश आहे.
दरम्यान, निवडणूक रिंगणात वाशिम जिल्ह्यातून आता माजी संचालक माधवराव काकडे, भागवतराव कोल्हे, विजय काळे, श्रीधर कानकिरड, उमेश ठाकरे, तुषार इंगोले, सुरेश गावंडे, प्रकाश कुटे, दिलीपराव जाधव, वामनराव देशमुख, भारती गावंडे, छाया वामनराव देशमुख हे उमेदवार आमने-सामने उभे आहेत. त्यांच्यापैकी कोण निवडणूकीत बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - मातोश्री समोर आत्मदहणाची परवानगी द्या, वाशिम जिल्ह्यातील रुग्णांची मागणी