वाशिम - डोक्यावर गाठोडे कमरेला बाळ शेकडो भेटले मदतीचे हात. पण, लागली घराची आस म्हणूनच सोळा दिवसांपासून सुरुय पायी प्रवास. हे कोणते काव्य नसून टाळेबंदीतील ज्वलंत वास्तव आहे. मागील सोळा दिवसांपासून रखरखत्या उन्हात तान्हूल्या बाळाला कमरेला बांधून मुंबई ते वाशीम जवळपास 600 किलोमीटर पायी प्रवास वाशीमच्या कोंडाळा झामरे गावातील तागड दाम्पत्यांनी केला.
बाळाला कमरेला बांधून दाम्पत्याने केला मुंबई ते वाशिम पायी प्रवास कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वजण आहे त्या ठिकाणीच अडकले. त्याचप्रमाणे उदरनिर्वाहासाठी गेलेल हे दाम्पत्यही मुंबईत अडकले. नुकतेच मुंबईत गेलेल्या या दाम्पत्यांना खाण्या-पिण्याचीही अडचण निर्माण होऊ लागली. त्यामुळे त्यांनी घरी जाणाच्या निर्णय घेतला. पण, टाळेबंदीमुळे प्रवासी वाहतूक पुर्णपणे ठप्प असल्याने त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा प्रवास सुरु झाला. सोबत लहान बाळ असल्याने त्याला कमरेला बांधून उन्हापासून त्याचे संरक्षण व्हावे यासाठी छत्रीचा वापर करत अखेर हे दाम्पत्य सोळा दिवस पायी चालत वाशिम येथे पोहोचले आहेत. हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये 'महाराष्ट्र दिन' साधेपणाने साजरा