वाशिम - कोरोना विषाणूचा आता दैनंदिन जीवनावरही परिणाम जाणवु लागला आहे. कोरोना विषाणूच्या भितीने चक्क नियोजीत असलेला साखरपुड्याच्या कार्यक्रमात थेट लग्न उरकल्याचा प्रकार वाशिममध्ये घडला आहे.
हेही वाचा - कर्नाटक अन् पंजाबमध्ये आढळले कोरोनाचे नवे रुग्ण, देशात आतापर्यंत ४५ जणांना लागण..
जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे जनसामांन्यामध्ये याबद्दल भिती निर्माण झाली आहे. यामुळे सार्वजानिक समारंभासह लग्नविधी सारखे कौटुंबिक कार्यक्रमही प्रभावित होऊ लागले आहेत. वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील शुभम रामकिसनराव देशमुख आणि यवतमाळ जिल्ह्यातील तिवरंग येथील दिपाली कैलासराव कदम यांचे लग्न 14 मार्चला ठरले होते. त्यानुसार सोमवारी यवतमाळमधील पुसद येथील जेष्ठ नागरिक भवनात साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मात्र कोरोना विषाणूच्या भितीमुळे नियोजीत असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातचं त्यांनी लग्न उरकून घेतले.