ETV Bharat / state

ईटीव्ही भारतच्या बातमीने प्रशासनाला आली जाग; खैरखेडा गावाला दररोज मिळणार ४८ हजार लिटर पाणी

खैरखेडा गावात भीषण पाणीटंचाई असल्याने गावाला रोज ४८ हजार लिटर पाणी टँकरद्वारे देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गाव पाणीटंचाईतून मुक्त होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासोबतच ग्रामस्थ स्थलांतर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच या गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामही या गावात सुरू  करण्यात येणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या प्रश्नापासून मुक्तता मिळण्यासोबत गावातच काम मिळणार आहे.

खैरखेडा गावाला दररोज मिळणार ४८ हजार लिटर पाणी
author img

By

Published : May 7, 2019, 4:41 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात भीषण पाणीटंचाई असल्याने पाण्यासाठी अनेक कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली होती. एवढेच नव्हेतर गावात पाण्याचे स्रोत नसल्याने महिलांना खड्ड्यातील पाणी कटोरा घेऊन घोट-घोट जमा करावे लागत असे. हे भयानक वास्तव ईटीव्ही भारतने १९ एप्रिलला समोर आणले होते. याच बातमीची दखल घेत प्रशासनाने खैरखेडा गावात रोज ४८ हजार लिटर पाणी टँकरद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

खैरखेडा गावाला दररोज मिळणार ४८ हजार लिटर पाणी

जिल्हा प्रशासनाकडून पाणीचे टँकर दिले जाणार असल्याने भीषण पाणीटंचाईतून गाव मुक्त होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासोबतच ग्रामस्थ स्थलांतर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच या गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामही या गावात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या प्रश्नापासून मुक्तता मिळण्यासोबत गावातच काम मिळणार आहे.

मागील तीन वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळी कमालीची घटत आहे. त्यामुळे गावातील विहिरी-बोअरवेल्स आटले आहेत. गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने नाल्यावर थोडा खड्डा करून त्यामधील घोट-घोट पाणी जमा करून पाणी भरण्याची वेळ या गावातील नागरिकांवर होती. त्यातही ते दूषित पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे महिला सांगतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याची बातमी ईटीव्ही भारतने दिली होती. याच बातमीचा आधार घेऊन प्रशासनाने खैरखेडा या गावात दररोज ४८ हजार लिटर टँकरने पाणी देण्याचे निर्णय घेतल्याने गावातील पाणी प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हस्य फुलले आहे.

Intro:अँकर : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात भीषण पाणी व पाण्यासाठी अनेक कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली होती एवढेच नव्हेतर गावात पाण्याचे स्रोत नसल्याने महिलांना खड्ड्यातील पाणी कटोरा घेऊन घोट-घोट जमा करावे लागत असल्याचे भयानक वास्तव ई टीव्ही भारत ने 19 एप्रिलला समोर आणले होते याच बातमीची दखल घेत प्रशासनाने खैरखेडा गावात रोज 48000 लिटर पाणी टँकर द्वारे देण्यात येणार आहे..यामुळं गावातील पाणी प्रश्न मार्गी लागला..

Body:व्हिओ : जिल्हा प्रशासन कडून पाणीचे टँकर दिल्या जाणार असल्याने गावात असलेल्या भीषण पाणी टंचाईतुन मुक्त होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..या सोबतच ग्रामस्त स्थलांतर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच या गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम ही या गावात सुरू होणार आहे...त्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाई चा प्रश्नासोबत व गावातच काम मिळणार आहे..

Conclusion:व्हिओ : मागील तीन वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळी कमालीची घटत आहे.त्यामुळे गावातील विहिरी-बोअरवेल्स आटले आहेत.गावात पाण्याचे दुर्भिक्ष असून नाल्यावर थोडा खड्डा करून त्यामधील घोट-घोट पाणी जमा करून पाणी भरण्याची वेळ या गावातील नागरिकांवर होती त्यातही ते दूषित पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे महिला सांगतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याची बातमी मध्ये ई टीव्ही भारत ने या गावातील परिस्थिती दाखविली होती याच बातमीचा आधार घेऊन प्रशासनने खैरखेडा या गावात दररोज 48000 लिटर टँकर ने पाणी देण्याचं निर्णय घेतल्याने गावातील पाणी प्रश्न मार्गी लागला यामुळे गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हस्य फुलले आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.