वाशिम - जिल्ह्यातील आसेगांवपेन येथील पैनगंगा नदी पात्रात मोटार सायकलला बांधलेल्या अवस्थेत एका तरूणाचा मृतदेह आढळला. संदीप शेषराव बकाल (वय 32 रा. घोडप खुर्द, ता. रिसोड) असे मृत तरूणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. खून करून त्याचा मृतदेह पाण्यात टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मृत तरूण संदीप हा 25 नोव्हेंबर पासून घरून निघून गेला होता. यानंतर त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. शुक्रवारी आसेगांवपेन येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलाखाली त्याचा मृतदेह आढळला. हा मृतदेह मोटार सायकलला बांधून आला होता. यावरून त्याचा खून करून मृतदेह नदीत टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - 'न्यायव्यवस्थेकडून लवकर न्याय मिळत नाही म्हणूनच लोकांमध्ये तीव्र भावना'