ETV Bharat / state

वाशिममध्ये लसीकरण केंद्रांवर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Covishield dose number Washim

जिल्ह्यात पुन्हा 45 वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या लसीचे डोस दहा दिवसांनी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर आज गर्दी केली. काही लसीकरण केंद्रांवर गोधळासह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे चित्र दिसून आले.

Vaccination Center crowd Washim
लसीकरण केंद्र गर्दी वाशिम
author img

By

Published : May 11, 2021, 8:20 PM IST

वाशिम - जिल्ह्यात पुन्हा 45 वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या लसीचे डोस दहा दिवसांनी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर आज गर्दी केली. काही लसीकरण केंद्रांवर गोधळासह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा - कोरोनाच्या संकटात कलिंगडाची शेती ठरली फायद्याची; दोन एकरात 6 लाखांचे उत्पन्न

४५ वय वर्षांपुढील नागरिकांसाठी सध्या लसीकरण सुरू असल्याने अनेक वृद्ध महिलाही लसीकरणासाठी रांगेत उभ्या असल्याचे दिसून आले. लसीकरण केंद्रावर उन्हात उभे रहावे लागत असल्यामुळे लोकं जिथे सावली मिळेल, त्या ठिकाणी घोळका करून उभे होते.

दरम्यान, आज जिल्ह्यात कोविशिल्डचे 6 हजार 800 व कोवॅक्सिनचे 1 हजार 660, असे 8 हजार 460 लसींचे डोस आले असून, जिल्ह्यातील 33 केंद्रांत कोविशिल्ड, तर 17 केंद्रांत कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मंद गतीने होत असल्याने आजपासून 12 केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत.

हेही वाचा - वाशिम : लॉकडाऊनमुळे पेट्रोल पंपासमोर वाहनधारकांच्या रांगा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.