वाशिम - अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने खरीप हंगाम २०१९-२० करिता पीक कर्ज वाटपाला प्रारंभ करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७ शाखांमधील ७१७ सभासदांना ५ कोटी १९ लाख ९ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामरगाव शाखा कार्यालयात पात्र सभासद शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. कारंजा तालुक्यात कारंजासह कामरगाव, मनभा, उंबर्डा बाजार, काजळेश्वर, पोहा व धनज अशा ७ ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जाळे पसरले असून, स्थानिक सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पात्र शेतकरी सभासदांना दरवर्षी खरीप पीक कर्जाचे वाटप करण्यात येते.