ETV Bharat / state

वाशिम : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्या - जिल्हाधिकारी - जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांचे नागरिकांना आवाहन

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या 14 गावे व परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यामुळे त्या भागात बाहेरील व्यक्तींना जाण्यास तसेच या भागातील व्यक्तींना गावाबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

washim
पाहणी करताना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक
author img

By

Published : Jun 17, 2020, 8:45 PM IST

Updated : Jun 17, 2020, 10:50 PM IST

वाशिम - दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा जिल्ह्यात वाढत चालला आहे. मंगळवारी दिवसभरात 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या 14 गावे व परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन ) घोषित करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यामुळे त्या भागात बाहेरील व्यक्तींना जाण्यास तसेच या भागातील व्यक्तींना गावाबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनास साथ देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

वाशिम : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्या - जिल्हाधिकारी

16 जूनला 13 रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात एकूण 65 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तर 6 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आता एकूण 55 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

अ‍ॅक्टीव्ह रुग्ण राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से, हिवरा गणपती, शहरातील निमजगा व रेल्वेस्टेशन परिसर, रिसोड शहरातील एकता नगर व कान्हेरी गाव, मालेगावमधील भेरा, खेर्डा, राजुरा व शहरातील एक भाग, मंगरुळनाथ तालुक्यातील शेलुबाजारमधील गुरुदेव नगर व रामगाव, कारंजा शहरातील काही भाग, दादगाव, शेमलाई, सुकळी व मानोरा तालुक्यातील भोयनी - नायनी व पोहरादेवी येथील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. यावेळी त्यांनी कंटेन्मेट झोनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. थर्मल स्कॅनरद्वारे कशी तपासणी करतात ते प्रात्यक्षिक करुन घेतले. त्यानंतर त्यांनी रेकार्डची पाहणी केली आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्या मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दी करणे टाळा असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

जिल्ह्यात साध्यस्थितीत पोहरादेवी-1, दादगाव -1 ,बोराळा हिस्से -5, रामगाव -1, शेलुबाजार -3, निमजगा -13, शेमलाई -1, कारंजा 14, सुकळी-3, मालेगाव शहर -1, खेर्डा -1, भेरा -2, रिसोड शहर -4, कान्हेरी-1, हिवरा -1, राजुरा -2 येथे कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

Last Updated : Jun 17, 2020, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.