ETV Bharat / state

वाशिममधील अंध बांधवांची डोळस कामगिरी... कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी राखी विक्री करून केली मदत

author img

By

Published : Aug 10, 2019, 6:57 PM IST

केकतउमरा येथील चेतन उचितकर हा जन्मता अंध आहे. चेतनच्या वडिलांनी अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील अंध मुलांना एकत्र करून 'चेतन अंकुर' ही संस्था उभी केली आहे. या अंध मुलांनी राख्या बनवून कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना मदत केली आहे.

वाशिममधील अंध बांधवांची डोळस कामगिरी

वाशिम - सध्या माणसा-माणसांतील जिव्हाळा संपत चालल्याचे चित्र आहे. मात्र राज्यातील जलप्रलयामुळे उघड्यावर आलेल्या कुटूंबांना राखी विक्रीतून आलेली रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय, वाशिम जिल्ह्यातील काही अंध व्यक्तींनी घेतला आहे. केकतउमरा येथील अंध बांधवांनी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कामगिरी केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

वाशिममधील अंध बांधवांची डोळस कामगिरी
वाशिम जिल्ह्यातील केकतउमरा येथे 'चेतन अंकुर' नावाचा पंधरा अंध व्यक्तींचा ग्रुप राहत आहे. प्रत्येक मोसमात वेगवेगळ्या प्रकारचे काम करून ते आपला उदरनिर्वाह स्वतःच करतात. सध्या त्यांनी राख्या बनवल्या आहेत. राखी विक्रीतुन मिळालेली रक्कम (दहा हजार रुपये) कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देणार आहेत. चेतन अंकुर या ग्रुपने वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना राख्या विकून हजारो रुपये जमा केले. विद्यार्थ्यांनी देखील यामार्फत पूरग्रस्तांना आपली मदत होईल म्हणून उत्स्फूर्तपणे राखी खरेदी केली.

Intro:स्लग:- अंधाची डोळस कामगिरी... कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांना राखी विक्री करून मदत देण्याचा निर्णय...

अँकर:- आजच्या युगात माणसातील जिव्हाळा आटत चालल्याचे चित्र आहे.मात्र राज्यातील जलप्रलयामुळे उघड्यावर आलेल्या कुटूंबाना राखी विक्रीतून आलेली रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेत वाशिम जिल्ह्यातील केकतउमरा येथील अंधानी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळं अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं या वरून स्पष्ट होत असून या कामगिरी च सर्वच स्तरातून कौतुक होत आहे....

व्हीओ:- वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन अंकुर येथे पंधरा जण अंध राहत असून आपला उदरनिर्वाह स्वतःच काम करून करतात प्रत्येक मोसमात वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात सद्या त्यांनी राख्या बनविल्या असून या राखीच्या पैस्यातून मिळणारी रक्कम त्यांनी दहा हजार रुपये कोल्हापूर व सांगली मध्ये झालेल्या पूरग्रस्तांना जिल्हाधिकारी मार्फत देणार आहे...

व्हीओ:- चेतन अंकुर या ग्रुपने आज वाशिम येथील रानीलक्ष्मी बाई शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना राखी विक्री करून हजारो रुपय जमा केले आहे.यामार्फत विद्यार्थ्यांनी आपला पूरग्रस्तांना मदतीत सहभाग असणार असल्यामुळे उत्स्फूर्तपणे राखी खरेदी करून आनंद व्यक्त केला आहे...

व्हीओ: केकतउमरा येथील चेतन उचितकर हा जन्मता अंध आहे.त्यामुळं चेतनच्या वडिलांनी अकोला,वाशिम,यवतमाळ जिल्ह्यातील अंध मुलांना एकत्र करून चेतन अंकुर येथे प्रशिक्षण देऊन अंध असूनही त्यांना जगण्याचा मार्ग दिला आहे.यंदा त्यांनी राखी बनवून त्यापासून मिळालेली रक्कम सामाजिक कामात खर्च करीत आहेत त्यामुळं आम्ही सर्व शिक्षकांनी ह्या राखी खरेदी करून त्याच्या या समाज कार्यात सहभाग नोंदविला असे शिक्षक सांगतात....

व्हीओ:- एकीकडे माणसातील माणुसकी संपत असल्याचं चित्र सर्वदूर बघावयास मिळत आहे.मात्र वाशिम जिल्ह्यातील जन्मतःच अंध असलेल्या चेतन च्या टीम ने डोळसाला लाजवेल असा उपक्रम केल्यानं त्यांच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

बाईट :. जयमाला राऊत ( शिक्षिका ) (निळा रंग साडी)
बाईट : प्राची वाशिमकर (विद्यार्थिनी)
बाईट : अंध राखीकार
बाईट : माधुरी ढोले (मुख्याध्यापिका)Body:फिड सोबत आहेतConclusion:फिड सोबत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.