ETV Bharat / state

Defecation Free Village : ग्रामपंचायतचा तिसरा डोळा, उघड्यावर शौचास जाणाऱ्या भागातच सीसीटीव्ही कॅमेरे - हागणदारी मुक्त कंरजी गाव

मालेगाव तालुक्यातील करंजी येथील ग्रामपंचायतने अभिनव शक्कल लढवून उघड्यावर शौचास (Defecation Free Village Karanji ) जाणाऱ्या भागातच सीसीटीव्ही कॅमेरे लावून याला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. गावाबाहेर उघड्यावर शौच करणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असून, संबंधितांवर कारवाई होणार असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे. ग्रामपंचायतच्या 'तिसरा डोळा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करंजी
CCTV cameras in areas that people used to go toilet in Washim
author img

By

Published : Dec 19, 2021, 1:14 PM IST

वाशिम - गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी (Defecation Free Village Karanji ) शासनाचे प्रयत्न सुरू असले तरी अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात यश प्राप्त झाले नाही. मात्र, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील ग्रामपंचायतने अभिनव शक्कल लढवून उघड्यावर शौचास जाणाऱ्या भागातच सीसीटीव्ही कॅमेरे लावून याला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. गावाबाहेर उघड्यावर शौच करणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असून, संबंधितांवर कारवाई होणार असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे. ग्रामपंचायतच्या 'तिसरा डोळा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करंजी येथील ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
वाशिम जिल्ह्यात सर्वस्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयसाठी अनुदान वाटप करण्यात आले. मात्र, करंजी गावात शंभर टक्के उद्धिष्ट पूर्ण झाले नसल्याने ग्रामस्थ उघड्यावर जातात. गावात मागील त्यामुळे 4 महिन्यापासून ग्रामस्थांना वारंवार सूचना, नोटीसा दिल्या. तरीही नागरिक ऐकायला तयार नाहीत. उघड्यावरच शौचालयासाठी जातात. तर कचरा गावशेजारी आणून टाकणे व उघड्या वरच घाण आणून टाकल्या जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.या सर्वगोष्टी आळा घालण्यासाठी करंजी ग्रामपंचायतचे सरपंच गोपाल पाटील लहाने यांनी अफलातून शक्कल लढवत चक्क सीसीटीव्ही कॅमेरेच बसविले. प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा परिषद शाळेसमोर व आरोग्य उपकेंद्रासमोर 2 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून त्याची पूर्ण माहिती सरपंच गोपाल लहाने यांच्या मोबाईलवर मिळणार आहे.उगड्यावर शौचासला बसले व इतर प्रकारची घाण केलेले आढळून आल्यास सदर व्यक्तीस ग्रामपंचायतच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नसल्याचा दंड त्या व्यक्तीला करून त्याचे नाव ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लिहण्यात येणार आहे. एक लाख रुपये खर्चून 2 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर उर्वरीत 8 कॅमेरे गावात ज्या ठिकाणी घाण होते. त्या ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे सरपंच गोपाल पाटील लहाने यांनी सांगितलेआहे. सीसीटीव्ही कॅमेरयामुळे उघड्यावर शौचास जाणारे व इतर प्रकारची घाण करणाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. या प्रयोगामुळे गावं हंगदारीमुक्त होण्यास मदत होणार असून, ग्रामपंचायतच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - PM Narendra Modi Goa Tour : गोवा मुक्ती दिनानिमित्त मोदी गोवा दौऱ्यावर; अनेक कामांचा करणार शुभारंभ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.