ETV Bharat / state

पोहरादेवी येथे गर्दी करणाऱ्या 10 हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - वाशिम कोरोना अपडेट

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे वाशिम जिल्ह्यात जमाबंदी लागू आहे. मात्र, वनमंत्री हे पोहरादेवी येथे मंगळवारी आले होते. त्यावेळी सुमारे 8 ते 10 जणांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. यामुळे त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत परदेशी
वसंत परदेशी
author img

By

Published : Feb 24, 2021, 2:05 AM IST

Updated : Feb 24, 2021, 5:49 AM IST

वाशिम - वनमंत्री संजय राठोड हे मंगळवारी (दि. 23) बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आले होते. कोरोनाचे नियम पायदळ तुडवत त्यांच्या समर्थनार्थ 8 ते 10 हजार लोक आले होते. यामुळे पोलीस प्रशासनाने त्या 8 ते 10 हजार जणांविरोधात गुन्हा दाखल केले असून त्यातील 10 जणांची नावे निष्पन्न झाले आहेत.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

जिल्ह्यातील पोहरादेवी येथे हजारोच्या संख्येने वनमंत्री संजय राठोड यांचे समर्थक दाखल होते. वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना हजारोंच्या संख्येने संजय राठोड यांच्या समर्थानात लोक पोहरादेवी येथे दाखल झाले होते. त्यामुळे सर्व नियमांचे उल्लंघन केल्याने पोहरादेवी येथे 8 ते 10 हजार लोकांच्या विरोधात वाशिम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासानंतर आणखी काही जणांची नावे निष्पन्न होणार असल्याची माहिती वाशिमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणात घाणेरडे राजकारण झाले - संजय राठोड

Last Updated : Feb 24, 2021, 5:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.