वाशिम - वाशिम लोकसभा मतदारसंघात ४ वेळा प्रतिनिधित्व केलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे शिवसेना उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव आले आहे. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यामधील वाद हा तात्पुरता असून, तो माझा भाऊ आहे. भावाची पाठीवर थाप आणि शिवसैनिकांचा विश्वास यामुळे यंदा पाचव्यांदा लोकसभा निवडणूक आपणच जिंकणार असल्याचे मत यावेळी भावना गवळी यांनी व्यक्त केले.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये, यासाठी आमदार राजेंद्र पाटणी, राज्यमंत्री मदन येरावार, संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, अमरावती येथे झालेल्या युतीच्या पहिल्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारीमुळे नाराज नेते पालकमंत्री संजय राठोड यांना आपल्या बहिणीला निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे.