वाशिम - देशात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून, राज्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात सरकारकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राजमुद्रा ग्रुप आणि तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे.
यादरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या चमूने शेलुबाजार परिसरातील जवळपासच्या गावांमध्ये जाऊन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काळजी कशी घ्यावी या संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.