वाशिम - रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजीवांसाठी वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशनने जिल्ह्यातील वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात कृत्रीम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम राबवला आहे. हे पाणवठे टँकर आणून भरण्यात आले आहेत.
लोकसहभागातून हे पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मागच्या वर्षी वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात 10 पाणवठे तयार करण्यात आले होते. यावर्षीदेखील 10 पाणवठे तयार करण्याची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे हजारो वन्यजीवांची तहान भागवता येणार आहे. या उपक्रमासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमचे परिसरात कौतुक होत आहे.