वाशिम - सध्या राज्यात ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहत आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षक, मुख्यध्यापकांनी केलेल्या सर्व्हेतून जिल्ह्यातील 65 टक्के पालकांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 779 शाळा असून वर्ग पहिली ते आठवीची एकूण विद्यार्थी संख्या 1 लाख 29 हजाराच्या घरात आहे. यापैकी 65 टक्के अर्थात 83 हजार 800 पालकांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल नाहीत. उर्वरीत 45 टक्के पालकांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल आहेत. त्यामुळे नियोजित वेळेवर शाळा सुरू न झाल्यास ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या नियोजनातही 'अॅन्ड्रॉईड मोबाईल' चा मोठा अडथळा राहणार आहे.