ETV Bharat / state

कोरोना चाचणी टाळली.. वाशिम जिल्ह्यातील आस्थापनांना लागले टाळे! - washim collector actions on establishments in Malegoan

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनाधारक, व्यावसायिक यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

Shops closed
दुकाने बंद
author img

By

Published : Mar 26, 2021, 10:29 PM IST

वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी न करणाऱ्या काही आस्थापनांच्या मालकांना चांगलेच महागात पडले आहे. कोरोना चाचणी न केल्याने दुकाने व आस्थापना बंद करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. शहरी व ग्रामीण भागात आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत आज मालेगाव, कारंजा, शेलूबाजार येथील दुकाने बंद करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील सर्व आस्थापनाधारकांनी २५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासाने दिले आहेत. कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांच्या आस्थापना २६ मार्चपासून बंद करण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काढले होते.

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनाधारक, व्यावसायिक यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणी न केल्यास संबंधित आस्थापना बंद करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. मुदत संपताच आज मालेगाव शहरातील ३२, कारंजा शहरातील ९, मंगरूळपीर शहरातील ३८ व शेलूबाजार येथील १ आस्थापना बंद करण्यात आली आहेत.

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहन परवान्याच्या वैधतेला जूनपर्यंत वाढ

मालेगाव शहरात ५१२ आस्थापनांची तपासणी

मालेगाव शहरात एकूण १८७२ आस्थापना आहेत. त्यापैकी ५१२ आस्थापनांची तपासणी आज करण्यात आली आहे. यापैकी ३२ आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी केली नसल्याने त्यांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच मंगरुळपीर शहरातील तपासणीमध्ये ३८ आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी केली नसल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्या आस्थापनासुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मुख्याधिकारी विकास खंदारे यांनी दिली.

हेही वाचा-छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

कारंजा शहरातही कारवाई-
कारंजा शहरातील आस्थापनांची तपासणी करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. आजपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ९ दुकानदारांनी कोरोना चाचणी केली नसल्याचे आढळून आल्याने त्यांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका दुकानावर कारवाई करण्यात आल्याची माहिती कारंजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब दोळारकर यांनी दिली.

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आस्थापना, दुकानांच्या तपासणीसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. आस्थापनांची आजपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.